खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. एम. सी. महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५ २६ मध्ये प्रवेश घेतलेल्या तुम्हा सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनींचे स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. महाविद्यालयीन शिक्षणाचा हा काळ तुमच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी सर्वांना सुरुवातीलाच मनःपूर्वक शुभेच्छा देतो. संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष जंगम, उपाध्यक्ष श्री. अबुबकर जळगांवकर, कार्यवाह श्री. किशोर पाटील व महाविद्यालय विकास समितीच्या (CDC) मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाशी संलग्र असलेले आपल्या के.एम.सी. महाविद्यालयास ग्रामीण भागातील एक आदर्श महाविद्यालय बनविण्याचा आपला सर्वांचा प्रयढ़ आहे.
इ.स.१९७९ मध्ये महाविद्यालयाची सुरुवात झाली आणि टप्प्याटप्प्याने महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रात उत्तम अशी प्रगती केली आहे. महाविद्यालयाचे 'नॅक' कडून (National Assessment and Accreditation Council) पुनर्मूल्यांकन झाले आहे. त्यात आपल्या महाविद्यालयास उत्तम अशी B+ श्रेणी (Grade) मिळाली आहे, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. याशिवाय मुंबई विद्यापीठाने 'सर्वोत्कृष्ट महाविद्यालय' आपल्या महाविद्यालयास गौरविलेले आहे. या शैक्षणिक वर्षापासून BBI, BAF, B.SC.IT नवे शिक्षणक्रमास सुरु करण्यास मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळाली असून हे कोर्स करण्याची संधी विद्याथ्यींना उपलब्ध झाली आहे. खोपोली, खालापूर, चौक, कर्जत, नेरळ, वावोशी, मोहपाडा या परिसरातील ग्रामीण भागातून येणाऱ्या तुम्हा सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची संधी मिळावी व नोकरी-व्यवसायात उत्तम करिअर करता यावे, यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे. विद्याथ्यींच्या सर्वांगीण विकासाच्या हेतूने महाविद्यालयात पुरेशा व प्रशस्त वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, अभ्यासिका, जिमखाना इ.च्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरात CCTV लावण्यात आले आहेत. येत्या शैक्षणिक वर्षांत आणखी वर्गखोल्या व सुसज्य असे ऑडीटोरीयम तयार करतो आहोत.
शिक्षणक्षेत्रात उपयोजित शिक्षणाचा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात अनेक नवे बदल होत आहेत. गुणात्मकदृष्ट्या आपले महाविद्यालय त्यात कुठेही कमी पडू नये यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शैक्षणिक व संशोधनाच्या क्षेत्रात महाविद्यालय अग्रक्रमावर आहे. परीक्षेतील गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा व संशोधनाच्या क्षेत्रात महाविद्यालयाने आजपर्यंत केलेली प्रगती उल्लेखनीय व गौरवास्पद अशी आहे. महाविद्यालयाचे काही विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेले आहेत, तर संशोधनाच्या क्षेत्रात विद्यार्थी व प्राध्यापकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
बदलत्या काळात तुम्हा विद्यार्थ्यांना अधिकाधिक सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी संस्था सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तुमच्यातून उद्याचा सक्षम व परिपूर्ण विद्यार्थी घडावा, हीच अपेक्षा त्यामागे आहे. महाविद्यालयाची ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळताना संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य नागरिक, पालक, प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक शिक्षकेतर सेवकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनीचे बहुमोल सहकार्य मला लाभते आहे. त्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !!.
या शैक्षणिक वर्षातील तुमच्या यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.!!