logo

डॉ. दयानंद प्रभू गायकवाड

(प्र. प्राचार्य)

Principal's Message...

'योग्य करिअरची निवड म्हणजे जीवन विकासाची गुरुकिल्ली.'

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये के.एम.सी. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या तुम्हा सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्राचार्य या नात्याने स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित व जुन्या शिक्षणसंस्थेचे के. एम.सी. महाविद्यालय १९७९ साली सुरू झाले. ग्रामीण, आदिवासी व शेतकरी कुटुंबातील विद्याध्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी या हेतूने सुरू झालेल्या महाविद्यालयाचा टप्प्याटप्प्याने विकास होत आहे. लवकरच महाविद्यालय पन्नास वर्षाचा महत्त्वपूर्ण असा सुवर्ण महोत्सवाचा टप्पा पूर्ण करेल.

शैक्षणिक उत्कृष्टता आणि नवोपक्रमाचे केंद्र असलेल्या या महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करीत विद्यार्थ्यांची बौद्धिक वाढ, सर्जनशीलता आणि समग्र विकासासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. आपले महाविद्यालय ग्रामीण भागातील असूनही विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडलेल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये आणि मूल्ये प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. कला, विज्ञान व वाणिज्य हे पदवी अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर विज्ञान व वाणिज्य शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी ते पीएच. डी. पर्यंत उच्ब शिक्षणाची संधी देण्याचा प्रयत्न महाविद्यालयाचा आहे.

महाविद्यालयात असलेले अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक, शिक्षकेतर सेवकवृंद, आवश्यक पायाभूत सुविधा आणि पूरक असे शैक्षणिक बातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आतापर्यंतच्या माजी विद्याथ्यर्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगती बरोबरच कला, क्रीडा, संशोधन क्षेत्रात उत्तम यश संपादन करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी आज शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

A पदवी शिक्षणक्रम हा विद्यार्थ्यांच्या भावी करिअरची जडणघडण करण्याचा काळ असतो त्या दृष्टीने आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा शोध घेण्यास, त्यांच्या प्रतिभेचा विकास करण्यास आणि जबाबदार नागरिक बनण्यास प्रोत्साहित करतो. गेल्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ज्याद्वारे काळानुरूप आवश्यक असलेल्या ज्ञान व कौशल्यांच्या संबी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शन व समुपदेशन विद्यार्थ्यांना करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक, पदाधिकारी व सदस्य यांचे मार्गदर्शन व आवश्यक ते सहकार्य आम्हाला लाभते आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकः व कार्यालयीन सहकारी यांचेही महाविद्यालयाच्या विकासात मोलाचे योगदान आहे.

मला विश्वास आहे की, आपले के.एम.सी. महाविद्यालय तुम्हा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि जीवनविकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरेल. के.एम.सी. परिवारात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करून भावी यशाच्या वाटचालीत तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो.

डॉ. दयानंद प्रभू गायकवाड

(प्र. प्राचार्य)